

Marathi Entertainment News : लोकप्रिय मराठी मालिका, चित्रपट आणि वेब सिरीजमध्ये उल्लेखनीय भूमिका साकारणारी अभिनेत्री नेहा शितोळे आता एका नव्या प्रवासाला सुरुवात करत आहे. नेहा लेखिका बनून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याआधी ‘सीतारामम’ या दक्षिण भारतीय चित्रपटासाठी हिंदी संवाद लेखन केलेल्या नेहाने आता देवमाणूस ह्या सिनेमाच्या पटकथा आणि संवाद लेखनाची जबाबदारी उचलली आहे.