

actress Nishigandha Wad reflects on her journey
Sakal
निशिगंधा वाड अभिनेत्री
एखाद्या कलाकाराच्या आयुष्यात काही भूमिका अशा असतात, की त्या त्यांची कायमची ओळख बनतात. ती भूमिका कायम मनात घर करून राहते. माझ्यासाठी अशीच एक भूमिका म्हणजे ‘आव्हान’ या मालिकेतली ‘वीणा’. लोकांच्या डोळ्यांत ‘ही निशिगंधा आहे, ही वीणा आहे’ अशी ओळख शोधण्याचा जो प्रवास असतो, तेव्हा ती भूमिका अधिक जवळची वाटू लागते.