
Bollywood News : बालकलाकार म्हणून बॉलिवूडमध्ये सुरुवात करत नंतर एक दमदार अभिनेत्री आणि निर्माती म्हणून मराठी आणि बॉलिवूडमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्री म्हणजे पल्लवी जोशी. काश्मीर फाईल्स, ताश्कंद फाइल्स यांसारख्या बॉलिवूड सिनेमांमध्ये भन्नाट काम करत सगळ्यांच्या कौतुकास पात्र ठरलेल्या पल्लवी आता नव्या बॉलिवूड सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. अनुपम खेर नवीन सिनेमाचं दिग्दर्शन करत आहेत. या सिनेमात पल्लवी जोशी काम करणार आहेत.