

pooja birari
esakal
सध्या मराठी इंडस्ट्रीमध्ये कलाकारांची लगीनघाई सुरू असल्याचं दिसतंय. काही दिवसांपूर्वी अभिनेता मेघन जाधव आणि अभिनेत्री अनुष्का पिंपुटकर यांनी लग्नगाठ बांधली. मोठ्या थाटामाटात त्यांचा लग्नसोहळा पार पडला. या लग्नाला अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. याशिवाय कालच २५ नोव्हेंबर रोजी सहकुटुंब सहपरिवार फेम अभिनेत्री कोमल कुंभार हिनेदेखील गोकुळ दशवंत याच्यासोबत लग्नगाठ बांधली. रीलस्टार सुरज चव्हाण याच्या लागणीचीही चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. अशातच आता अभिनेत्री पूजा बिरारी हिचं केळवण मोठ्या थाटामाटात पार पडलंय.