
Entertainment News : अभिनेत्री प्राची पिसाट आणि ज्येष्ठ अभिनेते सुदेश म्हशीलकर यांच्यामधील वाद सध्या सगळीकडे गाजतो आहे. प्राची पिसाट यांनी सुदेश यांच्या चॅटचे स्क्रिनशॉट व्हायरल केल्यानंतर पाच दिवसांनी सुदेश यांनी सोशल मीडियावर सदर प्रकरणावर खुलासा केला. त्यांचं अकाऊंट हॅक झाल्याचं त्यांनी म्हटलं. पण यावर प्राचीने उत्तर देत सुदेश यांना प्रतिप्रश्न केला आहे.