
अभिनेत्री प्रिया मराठेचं 31 ऑगस्ट रोजी कॅन्सरशी झुंज देत निधन झालं असून तिच्या अकाली जाण्याने संपूर्ण मराठी मनोरंजन विश्व शोकाकुल आहे.
प्रियाची खास मैत्रीण आणि सहकलाकार प्रार्थना बेहेरे हिने सोशल मीडियावर भावनिक पोस्ट लिहून तिच्या आठवणींना उजाळा दिला.
दोघींनी मिळून ‘पवित्र रिश्ता’ या लोकप्रिय मालिकेत बहिणींच्या भूमिका साकारल्या होत्या आणि त्यांचं काम प्रेक्षकांच्या मनाला भिडलं होतं.