RAJESHWARI KHARAT: अभिनेत्री राजेश्वरी खरात हिचा मोठा चाहता वर्ग आहे. फँन्ड्री चित्रपटानंतर तिला मोठी प्रसिद्धी मिळाली. दरम्यान गेल्या काही दिवसात राजेश्वरी प्रचंड चर्चेत आली होती. तिने ख्रिश्चन धर्म स्विकारल्यानंतर तिला नेटकऱ्यांनी प्रचंड ट्रोल केलं होतं. दरम्यान राजेश्वरीने एका मुलाखतीत तिला आलेला कास्टिंग काऊचचा अनुभव सर्वांसोबत शेअर केला आहे.