Reem Shaikh Viral Video: अहमदाबाद विमान दृघटनेवर प्रश्न विचारताच हसू लागली अभिनेत्री, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, व्हिडिओ व्हायरल

Actress Reem Shaikh Trolled for Laughing at Ahmedabad Plane Crash Question: अहमदाबाद विमान अपघातावर एका अभिनेत्रीला प्रश्न विचारला असता तिला काय झालं होतं हेच माहित नव्हतं. त्यामुळे नेटकऱ्यांनी तिला प्रचंड ट्रोल केलं आहे.
Reem Shaikh Trolled for Laughing at Ahmedabad Plane Crash Question
Reem Shaikh Trolled for Laughing at Ahmedabad Plane Crash Questionesakal
Updated on

सध्या अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातात अनेकांनी प्राण गमावले. सर्वसामान्यापासून ते कलाकारापर्यंत सर्वजण दु:ख व्यक्त करत आहे. अशातच आता टीव्ही अभिनेत्री रीम शेखचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ती विमान दृघटनेवर प्रश्न विचारताच हसू लागली. तिच्या त्या कृतीमुळे सध्या सोशल मीडियावर ती ट्रोल होतेय.

'लाफ्टर शेफ्स 2' च्या सेटबाहेर रीम शेख स्पॉट झाली. त्यानंतर जेव्हा तिने पापाराझींशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी तिला विमान दृघटनेबाबत प्रश्न विचारला. 'मॅडम कालच्या दृघटनेबाबत काय सांगाल?' त्यावर रीम म्हणाली की, काल काय झालं होतं, काय होतं काल आणि ती हसू लागली. तिचं ते वागणं पाहून सर्व आश्चर्यचकित झाले.

रिमाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडिओनंतर नेटकऱ्यांनी तिला प्रचंड ट्रोल केलं आहे. देशात इतकी मोठी दृघटना होऊनही काहीच माहिती नसल्यामुळे तिला चांगलंच ट्रोल करण्यात आलं आहे.

सोशल मीडियावर तिच्या वागण्यामुळे नेटकऱ्याने म्हटलं की, 'नुसतं इन्स्टाग्राम वापरता येत. नुसत्या पोस्ट शेअर करता येतात.' तर दुसऱ्याने म्हटलं, 'हिला खायला बनवायला येत नाही, ना कॉमेडी करता येते ना तिच्याजवळ डोकं आहे.' तर एकजण म्हटलाय,'सगळं माहिती असंत उगाच प्रसिद्धीसाठी नाटकं करताय.'

Reem Shaikh Trolled for Laughing at Ahmedabad Plane Crash Question
SAAVLYACHI JANU SAAVLI ACTRESS: एक नंबर तुझी कंबर...सावळ्याची जणू सावली मालिकेतील सावलीचा भन्नाट डान्स, नेटकरी म्हणाले...'तु आणि सारंग..'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com