Marathi Entertainment News : मराठी कलाविश्वात लगीनघाई सुरु झालीये. रेश्मा शिंदेची हळद थाटात पार पडली. रेश्मा आज 29 नोव्हेंबरला तिचं लग्न आहे. सोशल मीडियावर तिच्या हळदी सोहळ्याचे फोटो शेअर करण्यात आले आहेत. .दाक्षिणात्य पद्धतीने रेश्माचा हळदी सोहळा पार पडला होता. हळदी सोहळ्याला तिने पिवळ्या आणि हिरव्या रंगाचं कॉम्बिनेशन असलेली घागरा चोळी घातली होती. तर तिच्या होणाऱ्या नवऱ्याने पिवळ्या रंगाचा कुर्ता घातला होता. सफेद रंगाचा दाक्षिणात्य पद्धतीचा पोशाख केलेल्या मित्रांच्या सोबत रेश्माने हळदी समारंभात प्रवेश केला. .रेश्माच्या नवऱ्याचं नावही उघड झालं आहे. त्याच नाव पवन आहे. हळदीत पार पडलेल्या विधींवरून रेश्माचा नवरा साऊथ इंडियन असावा असा अंदाज आहे. पण त्याच्याविषयी फार माहिती उघड होऊ शकली नाहीये. या समारंभात तिचे कोण मित्र सहभागी झाले होते हे अजून उघड झालं नाहीये. .मुलगी झाली हो ! प्यार का पंचनामा फेम अभिनेत्रीच्या घरी चिमुरडीचं आगमन ; दीड वर्षांपूर्वी केलं होतं बिझनेसमनशी लग्न .रेश्माच्या या फोटोवर अनेक चाहत्यांनी कमेंट करत तिचं अभिनंदन केलं. तिला पुढच्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. रेश्मा आणि पवनची जोडीही अनेकांना आवडली. "नजर ना लगे" अशी कमेंट तिची मैत्रीण विदिशा म्हसकरने केली. "हाय! किती क्युट दिसताय तुम्ही दोघे" अशी कमेंट एकाने केली. तर एकाने "तू माझी फेव्हरेट अभिनेत्री आहेस रेश्मा, तुमची जोडी खूप छान आहे, खुश राहा" अशी कमेंट एकाने केली आहे. .रेश्माने हे बंध रेशमाचे या मालिकेतून अभिनयविश्वात तिने पदार्पण केलं. त्यानंतर लगोरी-मैत्री रिटर्न्स, नांदा सौख्यभरे, चाहूल या मालिकांमध्ये तिने काम केलं. रंग माझा वेगळा या स्टार प्रवाहवरील मालिकेने तिला प्रसिद्धी दिली तर घरोघरी मातीच्या चुली ही तिची मालिका सध्या टेलिव्हिजनवर सुरु आहे. .Nitin Desai: नितीन देसाईंच्या मृत्यूनंतर ND Studio चं काय होणार? फडणवीसांनी सभागृहात दिलं उत्तर.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.