
Bollywood Entertainment News : बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार म्हणून राजेश खन्ना यांचं नाव घेतलं जातं. इंडस्ट्रीमध्ये आउटसायडर असलेल्या राजेश खन्ना यांना पहिल्याच सिनेमात रातोरात प्रसिद्धी मिळाली. एक टॅलेंट हंट शो जिंकल्यामुळे राजेश यांना पहिला सिनेमा मिळाला. ज्याचं नाव होतं आराधना. आजही हा सिनेमा अनेकांचा आवडता सिनेमा आहे. पण तुम्हाला माहितीये का ? राजेश खन्नांप्रमाणे त्यांच्या दोन्ही मुली मात्र बॉलिवूडमध्ये यश मिळवू शकल्या नाहीत.