
आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी लोकप्रिय मराठी अभिनेत्री रिंकू राजगुरू सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. रिंकूने 'सैराट' चित्रपटातून आपल्या अभिनयाची ताकद दाखवली. या चित्रपटाने तिला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. तिच्या 'झिम्मा २' चित्रपटातील भूमिकेचं देखील कौतुक झालं होतं. आपल्या अभिनयाच्या जोरावर तिने सिनेसृष्टीत स्थान निर्माण केलं. आता रिंकू पुन्हा एकदा चर्चेत आहे. तिच्या आईवडिलांनी दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली आहे. त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.