
Marathi Entertainment News : आदिनाथ कोठारे दिग्दर्शित पाणी या सिनेमाचं संपूर्ण देशात कौतुक झालं. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या या सिनेमातून अभिनेत्री ऋचा वैद्य हा नवीन चेहरा सगळ्यांच्या भेटीस आला. बालकलाकार म्हणून पदार्पण केलेल्या ऋचाने पहिल्यांदाच अभिनेत्री म्हणून या सिनेमातून मराठी इंडस्ट्रीत पदार्पण केलं. नुकताच ऋचाचा साखरपुडा थाटात पार पडला.