

SAMANTHA RUTH PRABHU SECOND MARRIAGE
ESAKAL
SAMANTHA'S SECOND MARRIEGE PHOTOS: लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेत्री सामंथा रूथ प्रभू हिच्या दुसऱ्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू होती. ती लोकप्रिय दिग्दर्शक राज निदीमोरु याच्याशी लग्नगाठ बांधणार असल्याचं बोललं जात होतं. आता त्या चर्चा खऱ्या ठरल्यात. सामंथाने कोइम्बतूर येथे राजसोबत विवाह केला आहे. चाहत्यांची लाडकी सामंथा दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकलीये. तिच्या लग्नाचे फोटोही समोर आलेत. तिने कोइम्बतूर येथील इशा फाउंडेशन येथील मंदिरात अत्यंत साध्या पद्धतीने विवाह केला आहे. त्यांच्या लग्नाने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. तर चाहते त्यांच्यावर शुभेच्छांचं वर्षाव करत आहेत.