
News : प्रसिद्ध अभिनेत्री, मॉडेल शेफाली जरीवालाचं निधन झालं. हृदयविकाराच्या झटक्यामुळे शेफालीने वयाच्या 42 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. तिच्या निधनाने तिचा नवरा पराग त्यागीला खूप मोठा धक्का बसला आहे. शेफालीने दिलेली एक जुनी मुलाखत सध्या चर्चेत आहे. या मुलाखतीत तिने तिचं पहिलं लग्न आणि परागसोबत थाटलेला दुसरा संसार यावर भाष्य केलं होतं.