tv9 ने दिलेल्या वृत्तानुसार लक्ष्मण उतेकर महाराष्ट्रातील दिग्गज तमाशा कलावंत विठाबाई नारायणगावकर यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट बनवणार आहे. तसंच या चित्रपटात विठाबाईच्या भूमिकेत श्रद्धा कपूर दिसण्याची शक्यता आहे. श्रद्धा कपूर पहिल्यांदाच अशी भूमिका साकारणार आहे. परंतु याबाबत अजून कोणतीही अधिकृत माहिती आलेली नाही. सध्या लक्ष्मण उतेकर या सिनेमामध्ये व्यस्त आहेत.