
अनेक मराठी मालिका आणि चित्रपटात झळकल्यानंतर हिंदी सिनेसृष्टीमध्येही स्वतःचा ठसा उमटवणाऱ्या लोकप्रिय अभिनेत्री स्मिता जयकर सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत. त्यांनी 'हम दिल दे चुके सनम' मध्ये ऐश्वर्या रायच्या आईची भूमिका केली होती. त्यांची ही भूमिका फार गाजली. खऱ्या आयुष्यात स्मिता या ऑटोमॅटिक रायटिंग करतात. त्या आत्म्यांसोबत संपर्क करू शकतात. अध्यात्म आणि अभ्यास, साधना यांच्या जोरावर त्या हे करतात. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी त्यांचा अनुभव सांगितलाय.