
Entertainment News : स्टार प्लस वाहिनी त्यांच्या आजमितीस सर्वात लोकप्रिय मालिका ठरलेल्या 'क्यूँकी सास भी कभी बहू थी बॅक' च्या नव्या सीझनसाठी सज्ज झाली आहे. या बातमीनेच चाहत्यांच्या उत्साहाला उधाण आले आहे. ही मालिका प्रदर्शित होण्यास सज्ज होत असताना, नवीन सीझनमधील तुलसीचा एक लीक झालेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि या मालिकेचे प्रमुख पात्र असलेल्या तुलसी विराणीचा पहिला लूक पाहण्याची चाहत्यांनी उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.