Snehal Tarde : प्रवीण तरडेंच्या पत्नीचा 'वेदाभ्यास'; इतक्या गुणांनी परीक्षा उत्तीर्ण,"ही खंत कायम..."

अभिनेत्री, दिग्दर्शिका स्नेहल तरडे यांनी यशाचं नवीन शिखर पादाक्रांत केलं.
Snehal Tarde
Snehal TardeEsakal
Updated on

मराठी इंडस्ट्रीमधील उत्तम दिग्दर्शक, अभिनेते आणि लेखक म्हणून प्रवीण तरडे यांची ओळख आहे. प्रवीण यांच्या सिनेमाचे अनेकजण चाहते आहेत. प्रवीण यांच्या बरोबरीनेच त्यांची पत्नी स्नेहल सुद्धा एक उत्तम अभिनेत्री आहे. नुकतच स्नेहल यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं.

स्नेहल यांनी गाठलं यशाचं शिखर

स्नेहल यांनी नुकतंच एका गोष्टीत यश संपादन केलं. कायमच वेगवेगळे विषय शिकणाऱ्या स्नेहल यांनी 'Study Of Vedas' (वेदांचा अभ्यास) हा अभ्यासक्रम पूर्ण करत त्याच्या परीक्षेत ७८% गुण मिळवून परीक्षा उत्तीर्ण झाल्या. सोशल मीडियावर त्यांनी पोस्ट शेअर करत त्यांनी त्यांची ही अचिव्हमेंट सगळ्यांसोबत शेअर केली.

स्नेहल यांची पोस्ट :

"'वेदांचा अभ्यास' -
स्वतःला हिंदू म्हणताना, आपल्या धर्माला सर्वश्रेष्ठ मानताना तो धर्म ज्या चार वेदांवर आधारीत आहे त्या वेदांचा मी योग्य पद्धतीने अभ्यास केलेला नाही याची खंत मला अनेक दिवस सतावत होती. पुण्यातील भीष्म स्कूल ऑफ इंडियन नॉलेज सिस्टम या संस्थेतर्फे Study of Vedas या अभ्यासक्रमात 78 टक्के मिळवून आज ती खंत मी दूर केली. भारतातील अनेक मान्यवर गुरुजनांच्या मार्गदर्शनामुळे या विषयात आता आणखी खोलवर जाण्याची प्रेरणा मला मिळाली आहे, आशीर्वाद असावा." असं कॅप्शन देत स्नेहल यांनी त्यांचं गुणपत्रक सगळ्यांसोबत शेअर केलं.

सोशल मीडियावर त्यांनी ही पोस्ट शेअर केल्यावर अनेकांनी कमेंट्सच्या माध्यमातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला. अभिनेत्री प्राजक्ता माळीने स्नेहल यांची पोस्ट रिशेअर करत त्यांचं अभिनंदन केलं. तर चाहत्यांनी त्यांचा अभिमान वाटतोय असं म्हंटलं.

Snehal Tarde
Pravin Tarde: दोस्तीचा पॅटर्न, सिनेमातील डायलॉग अन् 'धर्मवीर' मधील सीन; पुण्यातील सभेत प्रवीण तरडेंचं खणखणीत भाषण

दिग्दर्शक म्हणून पदार्पण

अभिनेत्री म्हणून स्वतःचा ठसा उमटवल्यानंतर स्नेहल आता मराठी इंडस्ट्रीत दिग्दर्शक म्हणून पदार्पण करत आहेत. लवकरच रिलीज होणाऱ्या 'फुलवंती' या ऐतिहासिक सिनेमाचं दिग्दर्शन त्यांनी केलंय. या सिनेमाचं मोशन पोस्टर काही दिवसांपूर्वीच रिलीज करण्यात आलं. या सिनेमात फुलवंतीची भूमिका कोण साकारणार याची उत्सुकता सगळ्यांना आहे.

Snehal Tarde
Phullwanti : प्राजक्ताची फुलवंती ! अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर प्राजक्ताचं सिनेनिर्मिती क्षेत्रात पदार्पण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com