Pravin Tarde: दोस्तीचा पॅटर्न, सिनेमातील डायलॉग अन् 'धर्मवीर' मधील सीन; पुण्यातील सभेत प्रवीण तरडेंचं खणखणीत भाषण

Pravin Tarde: प्रवीण तरडे यांनी भाषणात राज ठाकरेंचे कौतुक केले. तसेच त्यांनी धर्मवीर चित्रपटातील एका सीनचा किस्सा देखील सांगितला.
Pravin Tarde
Pravin Tardeesakal

Raj Thackeray: पुणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार मुरलीधर मोहोळ ह्यांच्या प्रचारासाठी काल पुण्यात जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी हजेरी लावली. या सभेत राज ठाकरे यांनी केलेल्या भाषणानं अनेकांचे लक्ष वेधले. या सभेत अभिनेता प्रवीण तरडे (Pravin Tarde) यांनी देखील भाषण केलं. या भाषणात प्रवीण तरडे यांनी राज ठाकरेंचे कौतुक केले आणि मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांना मत देण्याचे आवाहन लोकांकडे केले.

काय म्हणाले प्रवीण तरडे?

प्रवीण तरडे हे सभेतील भाषणात म्हणाले, "मी माझ्या मित्रासाठी इथे आलोय मुरलीधर मोहोळ हा माझा मित्र आहे. मी आज आमच्या दोस्तीचा पॅटर्न खूप लांबवर पोहोचवायला आहे. सालस, सज्जन आणि सुशिक्षित नेतृत्व आपल्याला मिळतंय. माझ्या चित्रपटातील एक डायलॉग घेऊन मी बोलेन, ‘दोन-दोन वर्ष पाऊस नाही पडला स्वराज्यात, तरी थंडीच्या दवावर ज्वारी, बाजरी काढणारी जात आहे आपली. परिस्थिती जेवढी बिकट, हिंदू तेवढाच तिखट’, हा डायलॉग बोलायची गरज आता या व्यासपीठावर यासाठी पडली आहे कारण कुणीतरी पुण्याचा रंग बदलण्याचा प्रयत्न करतंय. पण पुण्याचा रंग इतक्या सहजासहजी कोणी बदलू शकत नाही कारण इथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या बापजाद्याने या पुण्यात रक्त सांडलंय."

Pravin Tarde
Raj Thackeray : ''अजित पवारांनी कधीच जातीपातीचं राजकारण केलं नाही'' राज ठाकरे पुण्यात नेमकं काय म्हणाले?

सांगितला धर्मवीर चित्रपटातील सीनचा किस्सा

भाषणात प्रवीण तरडे यांनी त्यांच्या धर्मवीर या सिनेमातील किस्सा सांगितला. ते म्हणाले, "आज साहेब आले आहेत, म्हणून मी एक गोष्ट बोलतो. माझा धर्मवीर चित्रपट आला होते, त्या चित्रपटातील राज ठाकरेंचा एक सिनेमातून कट झाला, त्यावेळी अनेक मनसैनिक माझ्यावर नाराज झाले. पण राज ठाकरे यांना त्याचं कारण माहिती आहे.एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या अनेक भाषणात याबद्दल सांगितलेलं आहे.राज ठाकरे आमचे आदर्श आहेत."

"मुरलीधर मोहोळचा मित्र आणि मुळशीचा सुपूत्र म्हणून म्हणून एवढंच सांगेन की, पुढील अनेक वर्षांसाठी आपल्याला खंबीर नेतृत्व देईलस असं .सर्वांनी जास्तीत जास्त मतदान करा.मुळशीतल्या मावळ्यांनी मोदींना दिल्लीला पाठवण्याचं ठरवलं आहे. हाच मुळशीचा प्रामाणिकपणा आपल्याला सर्वदूर आहे.", असंही प्रवीण यांनी भाषणात सांगितलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com