अप्सरा बनली मंजुळा ! सालबर्डी सिनेमात सोनालीचा दिलखेचक अंदाज आणि भन्नाट डान्स

Sonalee Kulkarni New Song For Salbardi Movie : अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचं सालबर्डी सिनेमातील मंजुळा गाणं सोशल मिडियावर रिलीज करण्यात आलं. जाणून घेऊया या गाण्याविषयी.
अप्सरा बनली मंजुळा ! सालबर्डी सिनेमात सोनालीचा दिलखेचक अंदाज आणि भन्नाट डान्स
Updated on

Marathi Entertainment News : आपल्या दिलखेचक अदांनी भुरळ घालणारी 'अप्सरा' अर्थात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी नव्या अंदाजात चाहत्यांच्या भेटीला येण्यास सज्ज झाली आहे. येत्या १७ एप्रिलला प्रदर्शित होणाऱ्या ‘सालबर्डी’ या चित्रपटातील ‘मंजुळा’ या धमाकेदार गाण्यातून सोनालीचा मनमोहक आणि हटके अंदाज पहायला मिळणार आहे. ‘मंजुळा’ या आयटम साँगची कोरिओग्राफी तितकीच आकर्षक असून, याची कोरिओग्राफी फुलवा खामकर यांनी केली आहे. गुरु ठाकूर यांनी लिहिलेलं, संगीतकार पद्मनाभ गायकवाड यांचे संगीत असलेलं, हे गाणं आनंदी जोशी हिने गायलं आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com