

Auron Mein Kaha Dum Tha : बॉलिवूडमध्ये किंवा कोणत्याही सिने इंडस्ट्रीमध्ये पुरुष कलाकरांना अभिनयात टक्कर देणाऱ्या तितक्याच सक्षम महिला कलाकार आहेत. त्यांच्या अभिनयाचं कौतुक कायमच होतं पण कायमच एका मुद्द्यावर चर्चा होते ते स्त्री कलाकारांना पुरुष कलाकारांपेक्षा कमी मिळणाऱ्या मानधनावर. हा मुद्दाम कायमच वादग्रस्त ठरला आहे आणि यावर बऱ्याच अभिनेत्रींनी त्यांचं मत मांडलं आहे.
नुकताच स्त्री आणि पुरुष कलाकारांच्या मानधनात असलेल्या तफावतीबाबत अभिनेत्री तब्बूला प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाबाबत तब्बूने जाहीर नाराजी व्यक्त केली. 'औरो में कहाँ दम था' या तिच्या सिनेमाच्या प्रोमोशनवेळी हा प्रश्न तिला विचारण्यात आला.
वी आर युवा या चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये तिला हा प्रश्न विचारण्यात आला. यावर ती म्हणाली कि,"मीडियातील सगळी मंडळी स्त्री कलाकारांना मानधनात असणाऱ्या असमानतेबाबत प्रश्न करतात. पण प्रत्येक पत्रकार हा प्रश्न फक्त महिला कलाकारांनाच विचारतो. तुम्हाला हे माहित आहे कि पुरुष कलाकारांना जास्त मानधन मिळतं आणि स्त्री कलाकारांना कमी. तर तुम्ही हा प्रश्न मला का विचारताय ? मी याचं उत्तर कसं देऊ शकते ? मी हेच उत्तर देऊ शकते कि, मला इतके कमी पैसे मिळतात हे मला पटत नाहीये किंवा मला जितके पैसे मिळतात त्यात मी समाधानी आहे. तुम्ही पुरुष कलाकारांना का नाही विचारत त्यांना जास्त मानधन का मिळतं ? मला वाटतं त्यांचा याबद्दलचा दृष्टिकोन नक्कीच ऐकण्यासारखा असेल."
२ ऑगस्ट ला तब्बूचा 'औरो में कहाँ दम था' हा सिनेमा रिलीज झाला. या सिनेमात तिच्याबरोबर अजय देवगण आणि जिमी शेरगील यांचं मुख्य भूमिका आहेत. नीरज पांडे यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. विशेष म्हणजे अजय देवगण बरोबर तब्बूची ही दहावी फिल्म आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.