अभिनेत्री तेजश्री प्रधान हिचा मोठा चाहतावर्ग आहे. तिने तिच्या अभिनयाच्या जोरावर मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे. तेजश्री ही नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात राहते. नेहमीच ती चाहत्यांसोबत आयुष्यातील प्रत्येक गोष्ट शेअर करत असते. जगायचं कसं, याबाबतही ती चाहत्यांसोबत संकल्पना, गोष्टी शेअर करत असते. तिचे आयुष्याबाबतच्या संकल्पनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर सतत व्हायरल होत असतात.