
Marathi Entertainment News : मराठी इंडस्ट्रीमधील लोकप्रिय अभिनेत्री तेजश्री प्रधानचा आज वाढदिवस आहे. उत्तम अभिनय आणि उत्तम व्यक्तिमत्त्व म्हणून प्रसिद्ध असलेल्या तेजश्रीने आजवर अनेक प्रोजेक्टमध्ये काम केलं आहे. याबरोबरच तेजश्रीच्या मुलाखतीही खूप गाजतात. अनेक गोष्टींवर ती मांडत असलेली मतं तिच्या चाहत्यांना पटतात. नुकतंच तेजश्रीने सिच्युएशनशिपबद्दल आताच्या तरुणाईला सल्ला दिला.