तेजश्री प्रधान हिचा मोठा चाहतावर्ग आहे. तिच्या अभिनयाचे लाखो चाहते आहेत. अशताच प्रेमाची गोष्ट मालिका सोडल्यानंतर तेजश्री कोणत्या मालिकेतून दिसणार याची उत्सुकता चाहत्यांना लागली होती. दरम्यान तेजश्री झी मराठीच्या 'वीण दोघांतली ही तुटेना' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत ती सुबोध भावेसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे.