

urmila matondkar post for mohsin khan
esakal
बॉलिवूडची रंगीला गर्ल उर्मिला मातोंडकर हिने आजवर आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिंकली. तिच्या बॉलिवूडमधल्या करिअरची जितकी चर्चा झाली तितकीच चर्चा उर्मिलाच्या वैयक्तिक आयुष्याची देखील झाली. उर्मिलाने २०१६ रोजी काश्मिरी व्यावसायिक आणि मॉडेल मोहसीन अख्तर याच्याशी लग्न केलेलं. मात्र त्यांच्यात काही वर्षातच दुरावा आला. २०२४ मध्ये ते दोघे वेगळे होणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यानंतर त्यांनी घटस्फोट घेत सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिलेला. आता मोहसीनने दुसरं लग्न केलं आहे. मात्र त्याने केलेल्या पोस्टवर उर्मिलाने त्याला टोमणा मारलाय.