
Marathi Entertainment News : अभिनेत्री उषा नाडकर्णी यांनी आजवर अनेक भूमिका साकारल्या आहेत. माहेरची साडीमधील त्यांनी साकारलेली सासूची भूमिका गाजली. आता उषा नाडकर्णी लवकरच 79 वर्षांच्या होतील. पण त्या सध्या चर्चेत आल्या आहेत त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे. उतरत्या वयात आलेल्या एकटेपणामुळे त्या त्रस्त झाल्या आहेत.