
Marathi Entertainment News : मराठी इंडस्ट्रीमधील दिग्गज अभिनेत्री म्हणजे उषा नाडकर्णी. खणखणीत आवाज, स्पष्टवक्तेपणा आणि उत्तम अभिनयासाठी प्रसिद्ध असलेल्या उषा कायमच त्यांची ठाम मतं मांडतात. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी एका नाटकाच्या शोवेळी त्यांच्यावर ओढवलेल्या भयानक प्रसंगाविषयी सांगितलं.