
Marathi Entertainment News : मराठी सिनेमा आणि मालिकांमधील खाष्ट सासू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री म्हणजे उषा नाडकर्णी. आजवर उषा यांनी अनेक भूमिका साकारल्या आहेत. माहेरची साडी सिनेमातील त्यांची भूमिका विशेष गाजली. पण उषा या त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखल्या जातात. काही दिवसांपूर्वी त्यांनी दिलेल्या मुलाखतीत मराठी इंडस्ट्रीमधील काही लोकांवर त्यांनी टीका केली.