पांढऱ्या भिंती, बेड नाही, सोफा नाही; सुशांत सिंह राजपूतच्या घरात अशी राहतेय अदा शर्मा; म्हणते- ज्यांना बसायचंय त्यांनी...

ADAH SHARMA LIFESTYLE INSIDE SUSHANT SINGH RAJPUT HOUSE WITHOUT BED AND SOFA | लोकप्रिय अभिनेत्री अदा शर्मा दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या घरात राहतेय. या घराचा तिने अगदी कायापालट केलाय.
ada sharma shushant rajput house look

ada sharma shushant rajput house look

esakal

Updated on: 

बॉलिवूड कलाकार म्हटलं की डोळ्यासमोर येते ती उंची लाइफस्टाइल आणि आलिशान घरं. महागडं फर्निचर आणि श्रीमंतीचा बडेजाव. मात्र एक अभिनेत्री या सगळ्याला अपवाद ठरलीये. लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री अदा शर्मा हिच्या घराची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगलिये. त्याचं कारण ठरलंय तिचं घर. अदा मुंबईत राहते मात्र ती ज्या घरात राहते ते घर लोकप्रिय दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याचं आहे. तो या घरात राहत होता. मात्र अदाने आता या घराचा कायापालट केलाय. तिच्या घरात कोणतंही फर्निचर नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com