Shaktiman : आदिनाथ-स्पृहाचा नवा सिनेमा; आदिनाथच्या 'सुपरमॅन' लूकने वेधलं लक्ष

Addinath Kothare new movie : अभिनेता आदिनाथ कोठारे आणि अभिनेत्री स्पृहा जोशी 'शक्तिमान' या नव्या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. या सिनेमाचं पोस्टर नुकतंच सोशल मीडियावर रिलीज करण्यात आलं.
Addinath Kothare new movie
Addinath Kothare new movie

सध्या मराठी इंडस्ट्रीत अनेक वेगवेगळ्या विषयांवरील सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. लहान मुलांच्या भावविश्वावर आधारित सिनेमे या आधीही प्रेक्षकांच्या भेटीस आले आहेत आणि आता अशाच एका नव्या सिनेमाची घोषणा नुकतीच करण्यात आली. दिग्दर्शक प्रकाश कुंटे यांचा आगामी 'शक्तिमान' सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. नुकतंच या सिनेमाचं पोस्टर सोशल मीडियावर रिलीज करण्यात आलं.

“शक्तिमान“ चित्रपटाच्या या पोस्टरमध्ये मराठीतील आघाडीचे कलाकार आदिनाथ कोठारे आणि स्पृहा जोशी आणि त्याबरोबर पदार्पण करणारा बालकलाकार ईशान कुंटे यांची खास झलक पाहायला मिळतेय. या पोस्टरमध्ये आदिनाथने सुपरमॅनच्या पाठीवर असलेला लाल रंगाचा क्रेप घातलेला असून ईशान आनंदाने हसताना दिसतोय. आपले वडील सुपरहिरो व्हावे असं स्वप्न असणाऱ्या मुलाची गोष्ट असणारी ही गोष्ट असावी असा अंदाज या पोस्टरवरून येतोय.

अनेकांनी या पोस्टरवर कमेंट करत पोस्टरचे कौतुक केलं आणि हा सिनेमा बघण्यासाठी ते उत्सुक आहेत असं म्हंटलं.

Addinath Kothare new movie
Adinath Kothare: कोकणातील सावंतवाडीत आदिनाथ कोठारेने केलं दशावतारात काम, व्हिडीओ व्हायरल

या चित्रपटात मुख्य भूमिकेत आदिनाथ कोठारे, स्पृहा जोशी यांच्यासह प्रियदर्शन जाधव, ईशान कुंटे आणि विक्रम गायकवाड यांच्याही भूमिका आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन प्रकाश कुंटे यांनी केले असून निर्मिती मोशनस्केप एन्टरटेनमेंटने केली आहे . येत्या २४ मे ला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

"कॉफी आणि बरंच काही ", "अँड जरा हटके " , "हंपी" आणि "सायकल" सारख्या गाजलेल्या दर्जेदार चित्रपटांसाठी ओळखले जाणारे दिग्दर्शक प्रकाश कुंटे या सिनेमाविषयी काही गोष्टी शेअर केल्या. "शक्तिमान“*चित्रपटाचे पोस्टर हे बरंच काही सांगून जातंय . हा चित्रपट संपूर्ण कुटुंबासाठी आहेच मात्र त्याबरोबर एक वेगळा संदेश देण्याचा सुद्धा मी प्रयत्न करत आहे . या चित्रपटाची गोष्ट प्रेक्षकांना चित्रपटगृहात नक्कीच खिळवून ठेवेल . या चित्रपटाचा ट्रेलर लवकरच आम्ही प्रेक्षकांसाठी आणत आहोत.“शक्तिमान“ हा चित्रपट घरातल्या प्रत्येक लहान मुलं , त्यांची प्रेमळ आई , आणि त्यांचा सुपरहिरो बाबा साठी आहे"

आदिनाथ आणि स्पृहा पहिल्यांदाच या सिनेमाच्या निमित्ताने एकत्र स्क्रीन शेअर करत आहेत. या आधी आदिनाथने अशाच काहीशा आशयाचा 'अवताराची गोष्ट' हा सिनेमा केला होता. या सिनेमाचं खूप कौतुक झालं होतं.

Addinath Kothare new movie
Adinath Kothare: मला अभिनयाचे बाळकडू घरातून मिळाले:आदित्य कोठारे

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com