Aadesh Bandekar: जेव्हा आदेश बांदेकरांनी खाल्लेला वडिलांचा बेदम मार; म्हणाले “तो दिवस अजूनही विसरू शकत नाही”

Aadesh Bandekar: आदेश यांनी मुलाखतीत त्यांनी त्यांच्या लहानपणीच मजेदार किस्सा शेअर केला.
जेव्हा आदेश बांदेकरांनी खाल्लेला वडिलांचा बेदम मार; म्हणाले “तो दिवस अजूनही विसरू शकत नाही”
Aadesh Bandekaresakal
Updated on

Aadesh Bandekar: ‘होम मिनिस्टर’ या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेले सगळ्यांचे लाडके भावोजी आदेश बांदेकर (Aadesh Bandekar) कायमच चर्चेत असतात. सूत्रसंचालक म्हणून त्यांनी बनवलेली ओळख असो किंवा राजकारणी म्हणून त्यांचं काम उल्लेखनीय आहे. नुकतंच आदेश यांनी दिलेल्या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या लहानपणीच मजेदार किस्सा शेअर केला.

आदेश बांदेकरांनी सांगितला किस्सा

लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या बऱ्याच आठवणी शेअर केल्या. आदेश यांनी ते लहानपणी खूप मस्तीखोर असल्याचं ते म्हणाले. ते म्हणाले,” लहानपणी मी खूपच मस्तीखोर होते. माझ्या आईला मी घाबरायचो पण तिने कधीच मला मारलं नाही पण माझ्या वडिलांनी एकदा मला खूप मारलं होतं. तो दिवस मी अजूनही विसरू शकत नाही. तो दिवस वटपौर्णिमेचा होता. त्यावेळी आम्ही ज्या चाळीत राहायचो त्या दिवशी आमचं काम असायचं चाळीतल्या बायकांना वडाच्या फांद्या आणून देणं. तर एकदा मी ठरवलं कि आईला यावेळी आपण फांद्या आणून द्यायच्या. मी सकाळीच उठून खूप दूरवर असलेल्या वडाच्या झाडाच्या इथे गेलो आणि फांद्या तोडून आणल्या आणि आमच्या घरात एक खूप मोठं पाण्याचं पिंप होतं त्यात टाकून ठेवल्या. संध्याकाळी बाबांना कामावरून घरी परत येत असताना त्यांना घरी येताना कुणीतरी मी वडाच्या झाडावर चढल्याचं सांगितलं. ते घरी आले आणि त्यांना बाथरूममधील पिंपामध्ये वडाच्या फांद्या दिसल्या. त्यांनी मला मला ओरडुनच आत बोलवलं आणि त्याच फांद्यांनी मला बदडलं. तो मार आणि तो दिवस मी कधीच विसरू शकत नाही. आजही मी वटपौर्णिमेची तारीख मला कायम लक्षात राहते.”

जेव्हा आदेश बांदेकरांनी खाल्लेला वडिलांचा बेदम मार; म्हणाले “तो दिवस अजूनही विसरू शकत नाही”
Aadesh Bandekar: अफवांवर विश्वास ठेऊ नये.. आरोपांवरुन आदेश बांदेकरांची पुन्हा सूचक पोस्ट..

आदेश यांनी खूप कष्ट करत मराठी इंडस्ट्रीत स्वतःचं नाव कमावलं. 20 वर्षांहून अधिक काळ ते होम मिनिस्टरचं सूत्रसंचालन करत आहेत. तर त्यांनी सोहम प्रॉडक्शन अंतर्गत अनेक मालिकांची निर्मिती केली आहे. सध्या त्यांची निर्मिती असलेली ठरलं तर मग ही स्टार प्रवाहवरील मालिका टेलिव्हिजन विश्वातील नंबर १ मालिका आहे. जुई गडकरी आणि अमित भानुशाली यांची या मालिकेत मुख्य भूमिका आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com