

adinath kothare
ESAKAL
छोट्या पडद्यावर लवकरच काही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यात स्टार प्रवाह वाहिनीने तब्बल ८ मालिकांची घोषणा केली होती. मात्र काही जुन्या मालिका प्रेक्षकांचा निरोपही घेत आहेत. आता स्टार प्रवाह पाठोपाठ झी मराठीनेदेखील एका नव्या मालिकेची घोषणा केलीये. लवकरच झी मराठीवरील 'शुभ श्रावणी' ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. तर 'नागीण' ही बहुप्रतीक्षित मालिका झी मराठीवर सुरू होणार आहे. या मालिकेची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र आता झी मराठीने आणखी एका नव्या मालिकेची घोषणा केलीये. यात लोकप्रिय मराठी अभिनेता दिसणार आहे.