
aditi dravid
esakal
छोट्या पडद्यावरून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली लोकप्रिय मराठी अभिनेत्री अदिती द्रविड हिने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. 'अदितीने सुंदरा मनामध्ये भरली' या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात घर केलं होतं. ती एक उत्तम सूत्रसंचालिका, गीतकारदेखील आहे. 'माझ्या नवऱ्याची बायको' या लोकप्रिय मालिकेतील तिच्या भूमिकेमुळे तिला विशेष ओळख मिळाली. 'बाईपण भारी देवा' या चित्रपटातील 'मंगळागौर' हे गाणं अदितीने लिहिलं होतं. जे प्रचंड गाजलं. मात्र तुम्हाला ठाऊक आहे का की ती लोकप्रिय क्रिकेटपटू राहुल द्रविड यांची पुतणी आहे. आता सकाळ प्रीमिअरला दिलेल्या मुलाखतीत तिने राहुल द्रविड यांच्याबद्दल सांगितलं आहे.