
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या निधनाने संपूर्ण सिनेसृष्टी हादरलेली. मात्र त्याच्या एक आठवड्यापूर्वी त्याची मॅनेजर दिशा सालियन हिनेदेखील आत्महत्या केली होती. तिने ९ जून २०२१ रोजी १४ व्या मजल्यावरून उडी मारत आपलं जीवन संपवलं. पोलिसांनी तिने आत्महत्या केल्याचं सांगितलं होतं. मात्र आता पुन्हा एकदा हे प्रकरण चर्चेत आलं आहे. दिशाच्या निधनाच्या ४ वर्षानंतर तिचे वडील सतीश सालियन यांनी पुन्हा एकदा मुंबई हायकोर्टात धाव घेतलीये. माझी मुलगी आत्महत्या करू शकत नाही असं त्यांनी म्हटलंय. मात्र त्यासोबतच आणखी एक मोठा दावा या याचिकेत करण्यात आलाय.