

Latest Entertainment News: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'लक्ष्मीच्या पावलांनी' प्रेक्षकांची आवडती आहे. मालिकेतील अद्वैत आणि कलादेखील प्रेक्षकांचे आवडते आहेत. मालिकेत सध्या निरनिराळे ट्विस्ट येत आहेत. नशिबाने अद्वैत आणि कला यांची गाठ बांधली गेली. मात्र सुरुवातीला एकमेकांच्या प्रत्येक गोष्टीचा तिरस्कार करणारे कला आणि अद्वैत आता एकमेकांच्या जवळ येताना दिसतायत. आता या मालिकेचा नवीन प्रोमो व्हायरल झालाय ज्यात अद्वैत पहिल्यांदाच आपल्या सासूबाईंची बाजू घेऊन इतरांना सुनावताना दिसत आहे.