

laxmichya paullani
ESAKAL
छोट्या पडद्यावरील मालिका या प्रेक्षकांच्या आवडत्या असतात. या मालिकांमधील पात्र प्रेक्षकांना आपलीशी वाटतात. हे कलाकार जणू प्रेक्षकांच्या घरातले सदस्य होतात. स्टार प्रवाहवरील 'लक्ष्मीच्या पावलांनी' ही मालिकादेखील प्रेक्षकांची आवडती आहे. या मालिकेने काही महिन्यातच प्रेक्षकांची मनं जिंकली होती. यातील अद्वैत आणि कला यांची जोडी प्रेक्षकांची आवडती होती. मात्र आता या मालिकेत नवा ट्विस्ट आला आहे. मालिकेतील मुख्य अभिनेत्री प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. मात्र मालिकेच्या प्रोमोने प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी आणलंय.