
Marathi Entertainment News : कालचा रविवार हा भारतासाठी महत्त्वाचा होता तो आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यासाठी. इंडिया विरुद्ध न्यूझीलंड या अंतिम सामन्यासाठी काल संपूर्ण शहर रिकामं झालं होतं. भारतीय टीम आणि क्रिकेटप्रेमींनी पाहिलेलं दुसऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीचं स्वप्न काल पूर्ण झालं. भारतीय टीमने न्यूझीलंडचा चार गडी राखून दणदणीत पराभव केला. भारताचा विजय सामान्य नागरिकांबरोबर बॉलिवूड सेलिब्रिटीजनीही साजरा केला.