
Marathi Entertainment News : विकी कौशल याची मुख्य भूमिका असलेला आणि लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित छावा या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली. छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित या सिनेमात विकी कौशलने महाराजांची भूमिका साकारली होती तर अभिनेत्री रश्मिका मंदानाने महाराणी येसूबाई साहेबांची भूमिका साकारली. पण याबरोबरच या सिनेमातील मराठी कलाकारांनी प्रोमोशनदरम्यान किंवा नंतर केलेली वादग्रस्त विधानही गाजली.