
Entertainment News: हिंदी इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेता आणि कॉमेडियन सुनील पाल (Sunil Pal)1 डिसेंबरपासून बेपत्ता होता. एका शोनिमित्त तो मुंबईबाहेर गेला होता. त्यानंतर तो बेपत्ता झाला. कॉमेडियन घरी परत न आल्यामुळे आणि त्याचा फोन लागत नसल्यामुळे त्याची पत्नी सरिता पाल यांनी मंगळवारी मुंबईमधील नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. काही तासांतच पोलिसांनी सुनीलचा ठावठिकाणा शोधून काढला. पण या प्रकाराबद्दल नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.