

MAYASABHA
ESAKAL
'तुंबाड' या सिनेमाने प्रेक्षकांना वेड लावलं होतं. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाला म्हणावं तसं यश मिळालं नसलं तरी नंतर सोशल मीडियावरील पब्लिसिटीचा या सिनेमाला प्रचंड फायदा झाला. जेव्हा दुसऱ्यांदा या चित्रपट प्रदर्शित करण्यात आला तेव्हा प्रेक्षकांनी चित्रपटगृहाबाहेर गर्दी केली. २०१८ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाची चांगलीच चर्चा झाली. यात महाराष्ट्रातील एक अनोखी कथा पाहायला मिळाली. आता याच चित्रपटाच्या दिग्दर्शकाने म्हणजेच राही अनिल बर्वे याने त्याच्या नव्या चित्रपटाची घोषणा केलीये. 'मयसभा' असं या सिनेमाचं नाव असून या सिनेमाचा पहिला पोस्टर प्रदर्शित झालाय. मात्र या पोस्टरमधील अभिनेत्याला अनेकजण ओळखू शकलेले नाहीत.