

akshay gurav
esakal
गेल्या काही महिन्यात अनेक मराठी कलाकारांनी आपला घटस्फोट होत असल्याचं जाहीर केलं. छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री योगिता चव्हाण आणि अभिनेता सौरभ चौघुले यांच्याही नात्यात दुरावा आल्याचं बोललं जातंय. त्यांनी एकमेकांना सोशल मीडियावर अनफॉलो केलंय. सोबतच त्यांचे लग्नाचे फोटोदेखील त्यांनी हरवलेत. हे समजल्यावर त्यांच्या चाहत्यांनादेखील धक्का बसला. त्या धक्क्यातून सावरत नाहीत तोच चाहत्यांना आणखी एक धक्का बसला आहे. छोट्या पडद्यावरील आणखी एका अभिनेत्रीचा संसार मोडण्याच्या मार्गावर आहे.