

Aga Aga Sunbai Movie Compelete 50 Weeks In Theaters
esakal
Marathi Entertainment News : मराठी प्रेक्षकांच्या मनात घर करणारा आणि प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभलेला झी स्टुडिओज व सनफ्लॉवर स्टुडियोज निर्मित आणि केदार शिंदे दिग्दर्शित ‘अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई? हा चित्रपट आपला पन्नासावा गौरवशाली दिवस साजरा करत आहे. आठव्या आठवड्यातही हा चित्रपट प्रेक्षकांची गर्दी खेचत असून मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नागपूर, नांदेड, जालना, जळगाव या शहरांसह अनेक ठिकाणी या चित्रपटाला मिळणारा प्रेक्षकांचा प्रतिसाद कायम आहे. भावनिक आणि मनोरंजक क्षणांनी सजलेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला असून त्याची लोकप्रियता अजूनही कायम आहे.