गेल्या काही महिन्यांपासून सोशल मीडियावर बच्चन कुटुंबातील घरगुती वाद चर्चेचा विषय ठरले आहे. ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या नात्यात दुरावा झाल्याच्या चर्चा देखील सोशल मीडियावर जोर धरत आहेत. चाहत्यांच्या मनात त्यांच्या नात्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता लागून राहिली आहे. अशातच अभिषेक आणि ऐश्वर्या मुलगी आराध्यासोबत एकत्र पहायला मिळाले आहेत. त्यामुळे त्यांच्यातील दुरावा संपला आहे. त्यांना एकत्र पाहून चाहतेदेखील खूश झाले आहेत.