AISHWARYA-AVINASH NARKAR
esakal
AISHWARYA AVINASH NARKAR DANCE WITH TITIKSHA TAWDE: ऐश्वर्या आणि अविनाश नारकर हे मराठी सिनेसृष्टीतील सर्वांचं आवडतं कपल आहे. त्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर स्वत:चा चाहतावर्ग निर्माण केलाय. नेहमीच ते सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. त्यांचे डान्स व्हिडिओ, फोटो नेहमीच चाहत्यांसोबत शेअर करत असतात. अशातच आता ऐश्वर्या आणि अविनाश नारकरांनी अभिनेत्री तितीक्षा तावडेसोबत एका ट्रेंडिग गाण्यावर भन्नाट डान्स केलाय. त्यांच्या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.