

aishwarya narkar dance on ambabai mazi tu maay ga
esakal
मराठमोळ्या अभिनेत्री ऐश्वर्या नारकर कायमच सोशल मीडियावर चर्चेत असतात. अभिनयासोबतच त्या इतर अनेक गोष्टी करतात जे पाहून प्रेक्षक चकीत होतात. ऐश्वर्या सध्या 'आमच्या लाडक्या नाईकबाई' या मालिकेत दिसतायत. त्यांचा स्वतःचा व्यवसाय देखील आहे. त्यांनी थ्रेड अँड ठुमका नावाचा साड्यांचा ब्रँड सुरू केलाय. त्यांचं युट्यूब चॅनेलदेखील आहे. सोबतच त्या सोशल मीडियावर रिल्स आणि फोटोही शेअर करत असतात. त्यांच्या रिल्सवर चाहतेही उत्तम प्रतिसाद देताना दिसतात. अशातच आता ऐश्वर्या यांनी अभिनेत्री तितिक्षा तावडे हीच्यासोबतचा नवा रील चाहत्यांसोबत शेअर केलाय.