

aishwarya narkar
ESAKAL
मराठी सिनेसरीसृष्टीतील एव्हरग्रीन जोडी म्हणजे ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर. दोघेही अतिशय उत्तम कलाकार, उत्तम व्यक्ती म्हणून नावारूपाला आले. आपल्या अभिनयाने त्यांनी प्रेक्षकांना आपलंसं केलं. एकत्र काम करत असतानाच ते प्रेमात पडले. आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यांची जोडी प्रेक्षकांची आवडती आहे. त्यांचे अनेक रील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. मात्र ऐश्वर्या यांचं लग्नाआधीचं नाव वेगळं होतं आणि लग्नानंतर त्यांनी ते बदलायला सांगितलं होतं. त्यांनी असं का केलं याबद्दल अभिनेत्रीने एका मुलाखतीत सांगितलंय.