माहेरी एकुलती एक लेक पण सासरी खटल्याचं घर! अजूनही २ अविवाहित नणंदांसोबत संसार करतायत ऐश्वर्या नारकर

AISHWARYA NARKAR RELATIONSHIP WITH UNMARRIED SISTER IN LAWS : लोकप्रिय मराठी अभिनेत्री ऐश्वर्या नारकर या माहेरी एकुलत्या एक होत्या. मात्र सासरी आल्यावर इतकी वर्ष त्या एकत्र कुटुंबात संसार करतायत.
aishwarya narkar

aishwarya narkar

ESAKAL

Updated on

लोकप्रिय मराठी अभिनेत्री ऐश्वर्या नारकर आणि अभिनेते अविनाश नारकर कायम सोशल मीडियावर चर्चेत असतात. त्यांचे अनेक व्हिडिओ चाहत्यांमध्ये व्हायरल होत असतात. कधी कौतुक तर कधी टीका अशा स्वरूपात चाहते त्यांना प्रतिक्रिया देत असतात. इतकी हे कपल आनंदाने एकमेकांसोबत संसार करतंय. खरं तर त्यांची जोडी ही कपल गोलसाठी योग्य आहे. यामागे आणखी एक कारण म्हणजे त्यांच्या संसारात फक्त ते दोघेच नाहीत तर इतरही सदस्य आहेत. गेली अनेक वर्ष ऐश्वर्या या केवळ अविनाश यांच्यासोबतच नाही तर त्यांच्या दोन बहिणींना सोबत घेऊन संसार करत आहेत. अविनाश यांच्या दोन्ही बहिणींची लग्न झालेली नाहीत आणि त्या भावासोबतच राहतात.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com