

avinash and aishwarya narkar home pooja
esakal
श्रावण महिन्यात अनेक घरांमध्ये सत्यनारायणाची पूजा केली जाते. घरातील वातावरण आनंदमय राहण्यासाठी आणि सगळ्यांच्या आरोग्यासाठी ही पूजा केली जाते. लोकप्रिय अभिनेत्री ऐश्वर्या नारकर आणि अभिनेते अविनाश नारकर यांच्या घरीही अशाच पूजेचं आयोजन करण्यात आलेलं. त्यासाठी ऐश्वर्या यांनी सकाळी लवकर उठून पूजेची तयारी केलेली. पूजेसाठी त्यांनी प्रसादाचा शिरा तयार केलेला. सोबतच पुरणपोळी, बटाट्याची भाजी असा बेत होता. ऐश्वर्या यांनी एक व्हिडिओ शेअर करत या पूजेची झलक दाखवलीये.