Met Gala 2024 : अमेरिकन अभिनेत्रीने केली ऐश्वर्याची कॉपी ; मेटच्या रेड कार्पेटवर मोना पटेलची चर्चा... कोण आहे ही मोना?

Netizens trolled Mindy Kaling for her Met Gala Look : अमेरिकन अभिनेत्री मिंडी कलिंगवर ऐश्वर्याचा लूक कॉपी केल्यावरून टीका होतेय तर बिझनेसवुमन मोना पटेलने तिच्या स्टनिंग लूकने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं.
Met Gala 2024 : अमेरिकन अभिनेत्रीने केली ऐश्वर्याची कॉपी ; मेटच्या रेड कार्पेटवर मोना पटेलची चर्चा... कोण आहे ही मोना?

Met Gala 2024 : 'मेट गाला २०२४' या फॅशन जगतातील सगळ्यात मोठ्या फेस्टिव्हलला सुरुवात झालीये. जगभरातील फॅशन डिझायनर्स आणि सेलिब्रिटीज या शोला विविध लूकमध्ये हजेरी लावून सगळ्यांचं लक्ष वेधून घेतात. अभिनेत्री आलिया भट्टनेही यंदाच्या मेट गाला फेस्टिव्हलला हजेरी आणि तिचा लूक सगळ्यांनाच पसंत पडला.

आणखी एका अमेरिकन सेलिब्रिटीने मेटच्या रेड कार्पेटवर सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. तर भारतीय बिझनेसवुमन मोना पटेलचा रेड कार्पेट लूक सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

अमेरिकन अभिनेत्री आणि कॉमेडियन मिंडी कलिंगने मेटच्या रेड कार्पेटवर हजेरी लावली आणि क्षणार्धातच तिने हा लूक कॉपी केला असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगू लागलीये. मिंडीने शॅम्पेन रंगाचा आर्किटेक्चरल गाऊन घातला होता. तिच्या लूकचं रेड कार्पेटवर कौतुक झालं पण सोशल मीडियावर हे फोटो व्हायरल होताच अनेकांनी तिच्या लूकची तुलना ऐश्वर्या राय बच्चनच्या कान्स लूकशी करायला सुरुवात केली.

कान्स फिल्म फेस्टिवल २०२२ला ऐश्वर्याने बेबी पिंक रंगाच्या देजावू गाऊनमध्ये हजेरी लावली होती. अनेकांना तिचा लूक पसंत पडला होता. मिंडीचा रेड कार्पेटवरील लूक बघून अनेकांनी सोशल मीडियावर तिने ऐश्वर्याचा लूक कॉपी केलाय किंवा ऐश्वर्याच्या गाऊनच्या डिझाईनमध्ये बदल करत हा गाऊन बनवलाय अश्या कमेंट्स केल्या.

Met Gala 2024 : अमेरिकन अभिनेत्रीने केली ऐश्वर्याची कॉपी ; मेटच्या रेड कार्पेटवर मोना पटेलची चर्चा... कोण आहे ही मोना?
Met Gala 2024 : बावनकशी सौंदर्य ; मेट गालाला आलियाच्या लूकने वेधलं लक्ष... 'हे' आहे तिच्या खास साडीच वैशिष्ट्य

एकीकडे मिंडी ट्रोल होत असतानाच भारतीय फॅशन व्यावसायिक मोना पटेलच्या रेड कार्पेट लूकचं मात्र कौतुक होतंय. मोनाने यंदाच्या मेट गाला २०२४ फेस्टिव्हलला गोल्डन आणि पिंक रंगाच्या ऑफ शोल्डर गाऊनमध्ये हजेरी लावत सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं.

'मेकॅनिकल बटरफ्लाईज' अशी तिच्या गाऊनची थीम होती. तिच्या गाऊनवर आणि हातावर फुलपाखरांचे ग्लोव्ह्ज घातले होते. ही फुलपाखरं ती चालत असताना पंखही फडफडवत होती. या अनोख्या ड्रेसने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. अनेकांनी मोनाच्या या ड्रेसचं कौतुक केलं. आयरिस व्हॅन हेरपेन याने हा ड्रेस डिझाईन केला आहे.

कोण आहे मोना पटेल?

मोना ही मूळची वडोदऱ्याची असून लहान वयातच व्यावसायिक कारणांसाठी ती अमेरिकेला स्थायिक झाली. रुथगर्स विद्यापीठामधून (Rutgers University) तिने तिचं शिक्षण पूर्ण केलं. फॅशन इंडस्ट्रीतील ती दिग्गज व्यक्तिमत्त्व असून तिचे अनेक व्यवसाय आहेत. तिने कोचर फॉर कॉझ या संस्थेची निर्मिती केली असून ही संस्था फॅशनशी संबंधित क्षेत्रात काम करते. भारतातील व्हॅन हेरपेनच्या कारखान्यामध्ये तिचा हा मेट गालाचा ड्रेस बनवण्यात आला आहे.

Met Gala 2024 : अमेरिकन अभिनेत्रीने केली ऐश्वर्याची कॉपी ; मेटच्या रेड कार्पेटवर मोना पटेलची चर्चा... कोण आहे ही मोना?
Met Gala 2023 : रेड कार्पेटवर झुरळ आलं अन् सेलिब्रिटींपेक्षा जास्त फेमस झालं!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com