

Bollywood Entertainment News : बॉलीवूडचा अॅक्शन सुपरस्टार अजय देवगण लवकरच ‘आझाद’ या चित्रपटात एका दमदार भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचा नवीन गाण्याचा टीझर ‘आझाद है तू’ नुकताच प्रदर्शित झाला आहे. अजयसोबतच त्याचा पुतण्या अमन देवगणही या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. दिग्दर्शक अभिषेक कपूर यांनी या चित्रपटाला वेगळ्या उंचीवर नेलं असून, प्रेक्षकांना एक भावनिक कथा अनुभवायला मिळणार आहे.